साहित्य: एक वाटी टोमॅटोच्या फोडी, कांदा चिरून अर्धी वाटी, अर्धी वाटी बीटाचे काप, एक मोठा चमचा तिखट (लाल) मीठ चवीनुसार, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी.
कृती: प्रथम टोमॅटो, बीट व कांद्याच्या वेगवेगळ्या फोडी करून ग्राईंडरमध्ये बारीक करून घेणे. नंतर तेलाची मोहरी व हिंगाची फोडणी करून त्यात प्रथम कांदा नंतर बीटाचा रस नंतर टोमॅटो प्युरी असे क्रमाक्रमाने परतणे व साधारण घट्टसर झाल्यावर यात तिखट, मीठ घालणे. या चटणीत एक चमचा सांबार मसाला घातल्यासही अतिशय रुचकर लागते. रंगाने लाल असलेली ही चटणी अतिशय रुचकर व कॅल्शियम, हिमोग्लोबीनचा स्रोत असलेली आहे.