साहित्य : आवळे, काळेमिठ, जिरेपूड ओव्याची पूड.
कृती : आवळे कुकरमध्ये उकडून घ्यावेत व बिया काढून गर कुस्कुरून घ्यावा. अंदाजे, ओव्याची पूड, काळेमिठ, जिरेपूड घालून चांगले कालवून प्लास्टिकवर लहान लहान आकारात वड्या टाकाव्यात. नेहमीच जेवणानंतर पाचक वडी खाता येते. गॅसेस, अपचन इ. बर्याच विकारावर फायदा होतो.