Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात सोमवारी ३२ हजार ०७ रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात सोमवारी ३२ हजार ०७ रुग्णांना डिस्चार्ज
, मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (08:59 IST)
राज्यात सोमवारी ३२ हजार ०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील २४ तासांमध्ये १५ हजार ७३८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १२ लाख २४ हजार ३८० इतकी झाली आहे. यापैकी ९ लाख १६ हजार ३४८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मागील २४ तासांमध्ये ३४४ करोना मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३३ हजार १५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.
 
३२ हजार ७ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज मिळाल्याने महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७४.८४ टक्के झाला आहे. आजवर तपासण्यात आलेल्या ५९ लाख १२ हजार २५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख २४ हजार ३८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ५८ हजार ९२४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३५ हजार ५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ३४४ मृत्यूंपैकी २०० मृत्यू मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८१ मृत्यू हे मागील आठवड्यांमधले आहेत. उर्वरित ६३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालवाधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने त्यांच्या पत्रकात स्पष्ट केलं आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2020: RCB ने विराट कोहलीच्या विजयी पदार्पणाच्या जोरावर हैदराबादला रोमांचक सामन्यात पराभूत केले