महाराष्ट्रात रविवारी 3 हजार 206 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 3 हजार 392 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या राज्यात 37 हजार 860 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 65 लाख 44 हजार 325 एवढी झाली आहे.त्यापैकी 63 लाख 64 हजार 870 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.24 टक्के एवढा झाला आहे.
राज्यात आजवर 1 लाख 38 हजार 870 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे रविवारी 36 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.राज्यात सध्या 1 हजार 515 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत तर, 2 लाख 61 हजार 072 जण गृह विलगीकरणात आहेत.