राज्यात गुरुवारी दिवसभरात राज्यात 8 हजार 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर कोरोनामुक्त झालेल्या 7 हजार 391 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.तसेच 170 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 52 हजार 192 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96.17 टक्के झाले आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के इतका आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 48 लाख 24 हजार 211 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 89 हजार 257 (13.81 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात 5 लाख 81 हजार 266 रुग्ण होमक्वारंटाईनमध्ये आहेत.4 हजार 471 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात सध्या एकूण 1 लाख 07 हजार 205 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.