Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात 2,943 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

राज्यात  2,943 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
, शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (08:31 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या  दैनंदिन रुग्णसंख्येत शुक्रवारी  घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची  संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. राज्यात 2 हजार 620 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 2 हजार 943 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 63 लाख 97 लाख 018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  97.32 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 59 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 470 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर  2.12 टक्के इतका झाला आहे.
 
सध्या राज्यात 33 हजार 011 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 99 लाख 14 हजार 679 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 73 हजार 092 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 972 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,050 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवी मुंबईत तब्बल १२५ कोटींच हेरॉईन जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई