Dharma Sangrah

एकत्र कुटुंबातील तीन सख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

Webdunia
सोमवार, 20 जुलै 2020 (15:57 IST)
पिंपरी-चिंचवड शहरात एकाच कुटुंबातील १८ जणांना करोनाची लागण झाली होती. यांपैकी, तीनही सख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती संबंधित कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली. मृत्यू झालेल्या तिन्ही भावांचे वय ६० वर्षांच्या पुढे होते.
 
पोपटराव कलापुरे (वय ६६), ज्ञानेश्वर कलापुरे (वय ६३) आणि दिलीपराव कलापुरे (वय ६१, सर्वजण रा. पिंपरी) असे करोनामुळे मृत्यू झालेल्या तीन सख्ख्या भावंडांची नावे आहेत. त्यांच्यावर १५ दिवसांपासून चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
 
कलापुरे कुटुंबामध्ये एकूण १८ सदस्य असून ते एकत्रित राहतात. त्यात मोठ्या तेरा व्यक्ती असून पाच लहान मुले आहेत. पैकी, एकाला पाच जुलै रोजी करोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार इतर कुटुंबातील सदस्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्वच १८ जण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्वजण तातडीने चिंचवड येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. त्यानंतर काही दिवसांनी यांपैकी १५ जणांना सौम्य लक्षण असल्याने डिस्चार्ज देण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Ashok Kharat case रूपाली चाकणकर यांची चिंता वाढली, ईडी ने समन्स बजावले

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली; महाराष्ट्रात चर्चांना उधाण

प्रताप सरनाईक यांनी अवैध बाईक टॅक्सींवर कारवाई केली, ॲप्स बंद करण्याचे आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले

मुसळधार पाऊस आणि वादळामुळे सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

LIVE: सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू

पुढील लेख