कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केली जात आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जमावबंदीचे आदेश लागू केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर संपूर्ण देशात 21 दिवसाची संचारबंदी लागू केली आहे.
यातच महाराष्ट्रात (Maharashtra) आणखी 5 नवे कोरोनाबाधीत रुग्ण (Corona Patients) आढळल्यामुळे राज्यात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे.