Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण बरे होण्याऱ्यांचे प्रमाण वाढले

सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण बरे होण्याऱ्यांचे प्रमाण वाढले
, शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (08:09 IST)
राज्यात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही  रुग्ण बरे होण्याऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना व आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७,५३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,२५,१९७ झाली आहे. तर राज्यात  १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
 
राज्यात १,५०,०११ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर आज राज्यात १६,१७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण १४,३१,८५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८८.१ टक्क्यांवर पोहोचले आहे. याचबरोबर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४,०२,५५९ कोरोना चाचण्यांचा अहवाल १६,२५,१९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात २४,५९,४३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात  १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४९, ठाणे ७, नवी मुंबई २, उल्हासनगर महापालिका २, भिवंडी-निजामपूर मनपा २, मिरा-भाईंदर मनपा २, वसई-विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल मनपा ३, नाशिक ४, अहमदनगर १४, पुणे ११, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ११, सातारा १०, कोल्हापूर ६, सांगली ९, उस्मानाबाद ४, नागपूर २०, भंडारा ४ आणि अन्य १ यांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, सुमारे 600 किलो चांदी जप्त