यापुढे खासगी रुग्णालयांतील रुग्णांना निश्चित व अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औषध दुकान निश्चित करण्यात आले आहे. राज्यात एकुण ५९ दुकाने निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये २ हजार ३६० रुपयांना एक इंजेक्शन मिळणार आहे.
मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसेव्हिर हे इंजेक्शन दिले जाते. मात्र, या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मागील महिन्यांत प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. या इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
यापार्श्वभुमीवर आरोग्य विभागाने इंजेक्शन अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या दरात इंजेक्शन मिळण्याची दुकानेही निश्चित करण्यात आली आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे यावर नियंत्रण राहणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून जिल्ह्याची दैनिक गरजेनुसार आरोग्य विभागाकडे मागणी केल्यानंतर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल.
रेमडेसिव्हीरची किंमत (प्रति १०० ग्रम व्हायल) - २,३६० रुपये
विभागनिहाय औषध दुकानांची संख्या
पुणे - १३
मुंबई - ५
नाशिक - ९
नागपुर - ५
औरंगाबाद - ११
कोकण - १०
अमरावती - ५