Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना मृतांची संख्या वाढली मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

कोरोना मृतांची संख्या वाढली मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
, सोमवार, 17 मे 2021 (07:22 IST)
राज्यात एकाबाजूला नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होतेय आणि कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोना मृतांची संख्या वाढतच आहे. रविवारी  राज्यात ३४ हजार ३८९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९७४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३ लाख ७८ हजार ४५२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८१ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ लाख ६८ हजार १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
रविवारी  ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.७४ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे. रविवारी नोंद झालेल्या एकूण ९७४ मृत्यूंपैकी ४१५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३०६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३०६ मृत्यू, नागपूर-८०, पुणे-४९, कोल्हापूर-३४, सोलापूर-३०, नांदेड-१६, जळगाव-११, पालघर-११, बीड-१०, ठाणे-८, परभणी-७, सांगली-७, गडचिरोली-६, नाशिक-६, अहमदनगर-५, चंद्रपूर-५, रायगड-५, यवतमाळ-५, लातूर-४, सिंधुदुर्ग-३, जालना-२ आणि वाशिम-२ असे आहेत.
 
राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ११ लाख ३ हजार ९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३ लाख ७८ हजार ४५२ (१७.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४ लाख ९१ हजार ९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्युकरमायकोसिस : कोरोनाच्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस संक्रमण का होत आहे ? एम्स चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले