Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'कप्पा आणि डेल्टा' : WHO कडून भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरियंटचं नामकरण

'कप्पा आणि डेल्टा' : WHO कडून भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरियंटचं नामकरण
, मंगळवार, 1 जून 2021 (13:25 IST)
WHO नं  भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या B.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा (Delta)व्हेरियंट तर दुसऱ्या B.1.617.1 स्ट्रेनचं नामकरण कप्पा (Kappa)असं केलं गेलं आहे. WHOने ग्रीक अल्फाबेटच्या आधारावर कोरोना व्हेरियंटचे नामकरण केलं.
 
जगभरात कोरोनाचा प्रसार झालेला असून वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाचे नवनवे व्हेरियंट आढळत आहेत. अशात याच्या नावाबाबत अनेक अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे तो व्हेरियंट ज्या देशात आढळला त्याच देशाच्या नावानं याची ओळख सांगितली जात होती. याबाबत भारतानं आक्षेपही घेतला होता. यासोबतच मागील वर्षी चीननेही वुहान व्हायरस या शब्दावर आक्षेप घेतला होता. आता जागतिक आरोग्य संघटनेनं यावर उत्तर शोधलं असून ग्रीक अल्फाबेटच्या आधारावर कोरोना व्हेरियंटचं नामकरण केलं आहे.
 
भारतासोबतच इतर देशांमध्ये आढळलेल्या व्हेरियंटचंही नामकरण केलं गेलं आहे. ब्रिटनमध्ये 2020 मध्ये आढळलेल्या व्हेरियंटला अल्फा म्हटलं गेलं आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या व्हेरियंटला बीटा म्हटलं गेलं आहे. याच प्रकारे अमेरिकेत आढळलेल्या व्हेरियंटचही नामकरण केलं गेलं आहे.
 
मे महिन्याच्या सुरुवातीलाच भारतात आढळलेल्या कोरोना स्ट्रेनला भारतीय म्हणण्यावरुन वाद झाला होता. भारतीय व्हेरियंट म्हटल्याने केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला होता. ज्यात जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या B.1.617 व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट नाव दिल्याचं म्हटलं गेलं होतं. सरकारनं म्हटलं होतं, की WHO नं कधीही भारतीय असा उल्लेख केलेला नाही. अनेक माध्यमांनी असं वृत्त दिलं आहे, की जागतिक आरोग्य संघटनेनं B.1.617 व्हेरियंट जागतिक समुदायासाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या बातम्या खोट्या असल्याचं WHO नं स्पष्ट केलं होतं.
 
भारतीय व्हेरियंट या शब्दावर सरकारनं आक्षेप घेतल्यानंतर WHO नंही यावर प्रतिक्रिया दिली होती. WHO नं ट्विटरवर म्हटलं होतं, की जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही व्हेरियंटला देशाच्या नावावरुन नाव देत नाही. संघटना व्हायरसच्या स्वरुपाला त्याच्या शास्त्रीय नावानेच संबोधित करते आणि इतरांनीही असंच करावं, अशी आशा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाओमी ओसाकाची फ्रेंच ओपनमधून माघार, 'माध्यमांसमोर बोलल्यास दडपण येते'