Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs SL Live Score: विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरची शतकं हुकली

IND vs SL Live Score: विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरची शतकं हुकली
, गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (18:07 IST)
आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होतोय.
 
श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. डावाच्या सुरुवातीलाच कर्णधार रोहित शर्मा बाद झाला आणि विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी भारताचा डाव सावरत अर्धशतकं झळकावली.
 
सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची विराट कोहली बरोबरी करणार असं वाटत असतानाच विराट कोहली 88 धावांवर बाद झाला.
 
त्याआधी शतकाच्या उंबरठ्यावर आलेला शुबमन गिलही चुकीचा फटका मारून 92 धावांवर तंबूत परतला. एकापाठोपाठ एक विकेट गेल्याने भारताचा डाव संकटात आलेला असताना उपकर्णधार के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरला.
 
धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात के. एल. राहुल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने ८२ धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.
 
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा लाईव्ह स्कोअर इथे पहा :
तत्पूर्वी रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहलीनं श्रीलंकेविरुद्ध वन-डे कारकिर्दीमधील 70 वं अर्धशतक पूर्ण केलं. वन-डे क्रिकेटमधील गिलचं हे 11 वं अर्धशतक होतं. त्यानं 55 बॉलमध्ये 8 चौकारांसह हा टप्पा गाठला.
 
आज श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिसनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं होतं.
 
भारतीय संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित आहे. श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ होण्याची संधी टीम इंडियाला आहे.
 
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा आणखीन एक विक्रम मोडला
विराट कोहलीनं श्रीलंकेविरुद्ध 34 धावा करताच 2023 या कॅलेंडर वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. विराटनं ही कामगिरी आठव्यांदा केली.
 
त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिननं एका कॅलेंडर वर्षात हजार धावा करण्याची कामगिरी सातवेळा केली होती.
 
वानखेडे आणि भारतीय क्रिकेट रसिकांच्या आठवणी
भारत आणि श्रीलंका यांच्यातला विश्वचषक सामना म्हटलं 2011 मधल्या फायनलची आठवण येणं स्वाभाविक आहे.
 
2 एप्रिल 2011 च्या दिवशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच टीम इंडियानं श्रीलंकेला हरवून तब्बल 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला होता. मुंबईकर क्रिकेट चाहत्यांच्या मनात त्या आठवणी आजही ताज्या आहेत.
 
त्याच वानखेडे स्टेडियमवर हेच दोन संघ आता पुन्हा एकदा वन-डे विश्वचषकाच्याच लढतीत आमने-सामने येत आहेत. हा सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्याची औपचारिकता पूर्ण करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
 
कसा आहे दोन्ही संघाचा प्रवास?
यजमान टीम इंडियानं या विश्वचषकात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. सर्व सहा सामने जिंकून भारतीय टीम मोठ्या आत्मविश्वासानं मुंबईत दाखल झाली.
 
दुसरीकडे श्रीलंकेची या स्पर्धेतील सुरूवात निराशाजनक झाली.
 
भारत आणि श्रीलंका यांच्यात आत्तापर्यंत 167 एकदिवसीय सामने झालेत. भारतानं त्यापैकी 98 सामने जिंकले असून श्रीलंकेनं 57 सामन्यात विजय मिळवलाय.
 
दोन्ही संघात वन-डे विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत 9 सामने झालेत. यामध्ये भारत आणि श्रीलंका या दोघांनीही प्रत्येकी चार सामने जिंकले असून एक सामना पावसानं रद्द झालाय.
 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन-डे विश्वचषकातील इतिहास सम-समान असला तरी 2007 नंतर या स्पर्धेतील सर्व सामने टीम इंडियानं जिंकले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षण आंदोलन का पेटलं? सरकारकडे रोडमॅप नाही !