Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Lakshmi Pujan 2024 Muhurat दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि आरती मंत्रांसह संपूर्ण पूजा पद्धत

Lakshmi Pujan 2024 Muhurat  दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि आरती मंत्रांसह संपूर्ण पूजा पद्धत
, बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (13:00 IST)
Lakshmi Pujan 2024 Muhurat हिंदू धर्मात आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी दिवाळी सण साजरा केला जातो. अमावस्या तिथीच्या प्रदोषकाल आणि निशीथ काल मध्ये देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. प्रदोष काल निशीथ काल 31 ऑक्टोबर 2024 गुरुवारी रोजी असेल. अशात दिवाळीला लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त या दिवशी आहे. तसे तर उदया तिथीप्रमाणे दिवसाची पूजा आणि व्रत पाळले जातात परंतू दिवाळी हा रात्री साजरा करायचा सण आहे, म्हणून तो 31 तारखेलाच साजरा करावा.
 
अमावस्या तिथी सुरू होते - 31 ऑक्टोबर 2024 दुपारी 03:52 पासून.
अमावस्या तिथी संपेल - 01 नोव्हेंबर 2024 संध्याकाळी 06:16 पर्यंत.
 
31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळीला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त:-
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 04:49 ते 05:41.
प्रात: संध्या: 05:15 ते 06:32 पर्यंत.
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:42 ते 12:27 पर्यंत.
विजय मुहूर्त: दुपारी 01:55 ते 02:39 पर्यंत.
संध्याकाळचा मुहूर्त: संध्याकाळी 05:36 ते 06:02 पर्यंत.
संध्याकाळची पूजा: 05:36 ते 06:54 पर्यंत.
अमृत ​​काल: संध्याकाळी 05:32 ते 07:20.
निशीथ पूजेची वेळ: दुपारी 11:39 ते 12:31.
webdunia
01 नोव्हेंबर रोजी दिवाळी पूजेसाठी शुभ मुहूर्त -
1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करायचे असेल तर या दिवसाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
- लक्ष्मीपूजनाची वेळ- संध्याकाळी 05.36 ते 06.16 पर्यंत असेल
- प्रदोष कालचा मुहूर्त- संध्याकाळी 05:36 ते 08:11 पर्यंत असेल
webdunia
दिवाळीत लक्ष्मीची सोप्यारीत्या उपासना पद्धत:
दैनंदिन कामातून निवृत्त झाल्यानंतर लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र लाल किंवा पिवळ्या कापडाने झाकून लाकडी चौरंगावर ठेवावे.
मूर्तीला आंघोळ घाला आणि चित्र असेल तर ते पूर्णपणे स्वच्छ करा.
धूप आणि दिवे लावा. त्यानंतर देवीच्या कपाळावर हळद, कुंकु, चंदन आणि अक्षता लावा. त्यानंतर त्यांना हार आणि फुले अर्पण करा.
पूजेमध्ये सुगंध, चंदन, कुमकुम, अबीर, गुलाल, हळद, मेंदी लावावी. नंतर नैवेद्य अर्पण करा.
यानंतर देवीची आरती करावी. आरती आणि पूजेनंतर प्रसाद वाटप करा.
 
आश्विन कृष्ण पक्षातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. ब्रह्मपुराणानुसार या दिवशी मध्यरात्री महालक्ष्मी सदगृहस्थांच्या घरी फिरते. त्यामुळे या दिवशी घर आणि बाहेरची साफसफाई आणि सजावट केली जाते. दिवाळी साजरी केल्याने श्री लक्ष्मीजी प्रसन्न होतात आणि सदाचारी घरातील घरात कायमचा वास करतात. खरे तर दिवाळी हे वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, महालक्ष्मी पूजा, गोवर्धन पूजा, पाडवा आणि भाऊबीज या सणांचे मिश्रण आहे.
 
दिवाळीला देवीची संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधि:
सकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला.
आता खालील संकल्पाने दिवसभर उपवास करा-
 
मम सर्वापच्छांतिपूर्वकदीर्घायुष्यबलपुष्टिनैरुज्यादि-सकलशुभफल प्राप्त्यर्थं
गजतुरगरथराज्यैश्वर्यादिसकलसम्पदामुत्तरोत्तराभिवृद्ध्‌यर्थं इंद्रकुबेरसहितश्रीलक्ष्मीपूजनं करिष्ये।
 
संध्याकाळी पुन्हा स्नान करा.
लक्ष्मीजींच्या स्वागताच्या तयारीसाठी घराची साफसफाई केल्यानंतर भिंतीला चुना किंवा गेरूने रंग द्या आणि लक्ष्मीजींचे चित्र काढा. (देवी लक्ष्मीचा फोटोही लावता येईल.)
जेवणात स्वादिष्ट पदार्थ, गोड फळे, आणि अनेक प्रकारच्या मिठाई तयार करा.
लक्ष्मीजींच्या चित्रासमोर एक चौरंग ठेवा आणि त्यावर मौली बांधा.
त्यावर मातीची गणपतीची मूर्ती बसवावी.
त्यानंतर श्रीगणेशाला तिलक लावून त्याची पूजा करावी.
आता चौरंगावर सहा चौमुखी आणि 26 छोटे दिवे लावा.
त्यात तेल वात टाकून दिवे लावा.
नंतर पाणी, मौली, अक्षता, फळे, गूळ, अबीर, गुलाल, उदबत्ती इत्यादींनी पूजा करावी.
पूजेनंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक दिवा लावा.
एक छोटा आणि चार बाजू असलेला दिवा ठेवा आणि खालील मंत्राने लक्ष्मीची पूजा करा.
 
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरेः प्रिया।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्वदर्चनात॥
 
सोबतच खालील मंत्राने इंद्र देवाचे ध्यान करा-
ऐरावतसमारूढो वज्रहस्तो महाबलः।
शतयज्ञाधिपो देवस्तमा इंद्राय ते नमः॥
 
नंतर निम्न मंत्राने कुबेराचे ध्यान करा-
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च।
भवंतु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादिसम्पदः॥
 
या पूजेनंतर तिजोरीत गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्यात आणि त्यांची यथासांग पूजा करावी.
त्यानंतर घरातील सुनांना त्यांच्या इच्छेनुसार पैसे द्या.
रात्री बारा वाजता लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
यासाठी एका पलंगावर लाल कपडा पसरून त्यावर लक्ष्मी आणि गणेशाची जोडी ठेवा.
शंभर रुपये, दीड किलो तांदूळ, गूळ, चार केळी, मुळा, हिरव्या गवारच्या शेंगा आणि पाच लाडू जवळ ठेवा आणि लक्ष्मी-गणेशाची पूजा करा.
त्यांना लाडू अर्पण करा.
सर्व स्त्री-पुरुषांनी डोळ्यात दिव्यातून काजळ लावावे.
नंतर रात्री जागरण करून गोपाल सहस्रनामाचे पठण करावे.
या दिवशी मांजर तुमच्या घरी आली तर तिला हाकलून देऊ नका.
ज्येष्ठांच्या चरणांची पूजा करावी.
व्यावसायिक प्रतिष्ठान आणि गद्दींचीही विधीपूर्वक पूजा करावी.
रात्री 12 वाजता दिवाळी पूजेनंतर, चुना किंवा गेरूमध्ये कापूस भिजवा आणि गिरणीवर, स्टोव्ह, आणि सुपडीवर वर तिलक लावा. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता उठून जुन्या सुपडीत कचरा टाकायचा आणि फेकायला घेऊन जाताना 'ये लक्ष्मी ये, जा दारिद्रय जा' असे म्हणावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Narak Chaturdashi 2024: अभ्यंग स्नान मुहूर्त आणि मंत्रांसह पूजा पद्धत