धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक लोक सोनं, चांदी आणि भांडी खरेदी करतात. काही लोक या दिवशी वाहन देखील घेतात. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धन्वंतरि यांना आयुर्वेदाचे जन्मदाता आणि ज्ञाता मानले गेले आहे. या दिवशी त्यांची पूजा केल्याने जातक आजारापासून मुक्त होतो. या दिवशी अती स्वस्त वस्तू खरेदी केल्याने देखील आजार आणि शोक नष्ट होऊन जातकाला सुख-समृद्धी प्राप्त होते. तर चला जाणून घेऊया की त्या कोणत्या वस्तू आहे ज्या आपण खरेदी करु शकता-
1. कमळाचे बीज : कमळाच्या फळाला कमलगट्टा म्हणतात. याच्या आतून ज्या बिया निघतात त्यांची माळ बनते. आपण हवे असल्यास माळ खरेदी करु शकता पण याच्या बिया मिळाल्यास खरेदी करुन धन्वंतरि देवता आणि देवी लक्ष्मी यांना अर्पण करावे. देवी लक्ष्मीला कमळाचे फुल, फळ आणि बिया खूप आवडतात.
2. औषध : या दिवशी औषध नक्कीच खरेदी करावे. औषधे आपल्याला निरोगी ठेवतात. मान्यतेनुसार कालाबच, घौडबच, कायस्थ, हेमवती, शंकर जटा या सर्व अशी काही औषधे आहेत जी विकत घेऊन घरात ठेवली तर रोग दूर जातात.
3. गोमती चक्र आणि कवड्या : या दिवशी मुलांच्या सुरक्षेसाठी गोमती चक्र आणि धन समृद्धीसाठी कवड्या खरेदी कराव्यात.
4. झाड़ू : या दिवशी झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले गेले आहे. याने वर्षभरासाठी घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.
5. धणे : या दिवशी धणे खरेदी करुन नैवेद्य दाखवलं जातं. या दिवशी धणे खरेदी करणे शुभ मानले जाते.