साहित्य : दोन कलकत्ता पानं, अर्धा टीस्पून मिनाक्षी (पानवाल्याकडे मिळते), एक मोठा ग्लास कच्चे थंड दूध, तीन टीस्पून साखर, तीन ते चार बर्फाचे छोटे क्यूबस्.
कृती : प्रथम कलकत्ता पानं धुवून कात्रीने कापून त्यात साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. नंतर त्यातच कच्चे दूध, बर्फ व मिनाक्षी घालून चर्न करणे. थंडाई तयार.