Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होळी 2024 : होळी विशेष केशर-पिस्ता थंडाई, जाणून घ्या रेसिपी

thandai reicpe
, रविवार, 24 मार्च 2024 (08:30 IST)
देशात होळी सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी तयारी सुरु आहे. तसेच रंगांच्या या सणांमध्ये प्रत्येक राज्यात आपल्या आपल्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. या दिवशी लोक आपल्या कुटुंबासोबत तसेच मित्रमंडळींसोबत होळी साजरी करतात तसेच रंग खेळतात. होळी, धुळवड, रंगपंचमी हे सण विविध चविष्ट पदार्थांसाठी देखील ओळखले जातात. तसेच या पदार्थांमध्ये थंडाई देखील सहभागी होते. तर चला जाणून घेऊ या केशर-पिस्ता थंडाई रेसिपी 
 
साहित्य 
दूध, साखर , काजू, पिस्ता, बादाम, हिरवी वेलची, खसखस, मीरे पूड, वळलेल्या गुलाबाच्या, पाकळ्या, केशर, बाडीशोप 
 
कृती 
थंडाई बनवण्यासाठी एका वाटीमध्ये बादाम आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये काजू, पिस्ता, खरबूजेच्या बिया, खसखस या सर्वांना दहा मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. मग केशरला दुधामध्ये भिजवून ठेवा. यानंतर वेलची, बाडीशोप, मीरेपूड आणि गुलाबच्या पाकळ्या हे सर्व बारीक करून घ्या. सर्व सामान तयार झाल्यानंतर एका पातेलित दूध उकळवून घ्या. दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून हलवत रहा. यानंतर यामध्ये केशर भिजवलेले दूध घालावे. मग नंतर सर्व वस्तू दुधात मिक्स कराव्यात. मग हे दूध चांगले मिक्स झाल्यानंतर थंड करायला ठेवा. थंड झाल्यानंतर ही थंडाई आलेली मित्रमंडळी, पाहुणे सर्वाना दया. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bulletproof Coffee बुलेटप्रूफ कॉफी म्हणजे काय ? नियमित कॉफीपेक्षा आरोग्यदायी आहे का? रेसिपी जाणून घ्या