साहित्य : 2 लिटर दूध, 20 अंजीर, 1 वाटी क्रीम, 1 वाटी साखर, चायनाग्रास व कॉर्नफ्लॉवर प्रत्येकी 2-2 चमचे, थोडासा गुलाबी रंग.
कृती : सर्वप्रथम दुधात कॉर्नफ्लॉवर व चायनाग्रास घालून दूध आटवून निम्मे करावे. थंड झाल्यावर आटवलेल्या थोड्या दुधात अंजीराचे बारीक तुकडे करून भिजत घालावे. नंतर मिक्सरमधून प्रथम अंजीरचे तुकडे व क्रीम घालून वाटावे. त्यानंतर आटवलेले दूध मिक्सरमधून काढावे. त्यात एक-दोन थेंब गुलाबी रंग घालून आइस्क्रीम सेट करायला फ्रिजरमध्ये ठेवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा