अभिषेक बच्चन आणि गोल्डी बहल हे लहानपणापासूनचे पट्ट मित्र आहेत. घरात चित्रपटाचे वातावरण असल्याने त्यांनी बालपणातच चित्रपट बनविण्याची स्वप्ने पाहिली. घोडेस्वारी, तलवारबाजीं असा अॅक्शन चित्रपट बनवायचा, असे त्यांनी लहानपणीच ठरवून टाकले होते. त्यांची ही स्वप्नपुर्ती ‘द्रोण’ या चित्रपटाच्या निमित्ताने होत आहे.
‘द्रोण’ हा चित्रपट दोन ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल अभिषेकला मोठ्या आशा आहेत. यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी आणि अॅक्शन दृश्यांसाठी त्याने खास प्रशिक्षण घेतले. शूटिंगसाठी जास्त वेळ लागू नये म्हणून त्याने शूटिंग सुरू होण्यापूर्वीच प्रशिक्षण सुरू केले होते.
अभिषेकने ‘द्रोण’ मध्ये हृतीक रोशनशी स्पर्धा करण्याचा पर्यंत केल्याचे काहींचे मानणे आहे. अनेक चित्रपटांमधून गाजत असलेला हृतीक सुपरहीरो म्हणून गाजत आहे. आपणही सुपरहीरो होऊ शकतो हे अभिषेकला सिद्ध करायचे आहे. पण, तसे नसल्याचे अभिषेक सांगत आहे.