विदेशी कलाकारांना घेऊन हिंदी चित्रपट अनेकदा झाले आहेत. त्याचे कौतुकही झाले. मराठीला मात्र हा प्रकार नवा आहे. राज कपूर, देव आनंद, मनोज कुमार अशांनी तर अनेकदा विदेशींकडून आपल्या चित्रपटात काम करवून घेतले. मराठीतही १-२ अपवाद वगळता विदेशी कलाकार दिसले पण त्यांच्या व्यक्तिरेखा नगण्य होत्या. मात्र 'फॉरेनची पाटलीण' ची नायिका खरोखरीच फॉरेनची आहे. तिचे खरे नाव आहे - बिलियाना रॉडोनिच. या चित्रपटात तिने मध्यवर्ती म्हणजे नायिवेत्र्ची भूमिका वेत्र्ली आहे. मराठीत प्रथमच असे घडत आहे.चित्रपटाची निर्मिती संजीवनी गवई यांनी आपल्या 'एस ४ एंटरटेन्मेंट' बॅनरखाली वेत्र्ली आहे. चित्रपटाच्या निर्मितीचा हा पहिलाच अनुभव असला तरी आपल्या मनात नेहमीपेक्षा वेगळा चित्रपट द्यायचा असे मनात होते. तसेच पडद्यावर साकल्याचे संजीवनी गवई म्हणाल्या. मराठी प्रेक्षकांचे दर्जेदार मनोरंजन करण्याच्या तळमळीतून आपण या क्षेत्रात उडी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
'फॉरेनची पाटलीण'च्या विषयाबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रदीप घोणसीकर म्हणाले की, ''माती कोठेही गेले तरी मातीच असते, इथून तिथून सारखीच असते. तिला पाणी दिले की बी उगवते. माणसांच्या नात्यांचेही तसेच आहे. हाच विषय 'फॉरेनचीपाटलीण' या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे.'' चित्रपटाचे कार्यकारी निर्माते पवन वैद्य म्हणाले, की ''निर्माती नवीन असली तरी हात आखडता घेतलेला नसल्याने आवश्यक असलेल्या गोष्टी उपलब्ध होऊ शकल्या. नावावरुन मजेदार वाटणार्या या चित्रपटात भारतीय आणि पाश्चात्य संस्वृत्र्तीचा संघर्ष तर आहेच. पण त्यातील समान सूत्रांचे दर्शनही यात घडणार आहे. गावात राहूनही सुधारणा करता येते हा संदेशही यातून दिला जाणार आहे.''
या चित्रपटाला संगीतबद्ध केलंय लोकप्रिय संगीतकार अशोक पत्की यांनी. तर गावरान ढंगाची मस्त गाणी लिहिली आहे. कवी फ. मु. शिंदे यांनी. कथा-पटकथा, संवाद अशी महत्त्वाची जबाबदारी प्रताप गंगावणे यांनी पार पाडली आहे. चित्रपटाच्या निर्मितीची सूत्रे कार्यकारी निर्माते पवन वैद्य यांनी समर्थपणे सांभाळली आहेत.