Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 16 April 2025
webdunia

Father's Day : वडिलांचे हे 5 प्रकार जाणून आपल्याला आनंद होईल

Father's Day 2020
, गुरूवार, 18 जून 2020 (12:08 IST)
फादर्स डे म्हणजे वडिलांसाठी समर्पित असलेला दिवस. त्यांनी आपल्यासाठी जे काही केले आहे ज्यांच्यामुळे आज आपले अस्तित्व आहे. फादर्स डे वर आपण आपल्या वडिलांचा महत्त्वाविषयी बोलतो, जे की निर्विवाद सत्य आहे. पण आज आपण वडिलांच्या काही प्रकार, काही सवयी, गुणांबद्दल बोलू या. ज्यामुळे त्यांची एक विशेष ओळख आहे आणि त्यामुळे ते आपल्यामध्ये ओळखले जातात. 
 
1 उत्साह वाढवणारे वडील : वडिलांच्या या प्रकारामध्ये त्या सर्व वडिलांचा समावेश आहे जे आपल्या मुलांना प्रत्येक कामात प्रोत्साहित करतात. जे आपण कुठे चुकला आहात तर किंवा ते आपल्यावर रागावले असतील तरीही, ते आपल्याला ह्याच पद्धतीने योग्य मार्गदर्शन देतात.
 
2 तक्रार करणारे वडील : जोश्यांच्या मुलाला 10 मार्क पडले, तुला 9 का बरं पडले..।  आपल्यामध्ये सुधारणा करा, जीवनात काही चांगले करा. आयुष्यात काही तरी चांगले करा. अश्या सवयी सोडा आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या. अश्या प्रकारच्या गोष्टी आपण ऐकत असतो. 
 
3 शिस्तबद्ध वडील : हे अश्या प्रकाराचे वडील आहे जे घरात असताना बाकी कोणाचा आवाजच ऐकू येत नाही. हे घरातून बाहेर पडल्यावर आपल्याला आरामदायक वाटतं, कारण त्यांना शिस्तबद्धता आवडते.
 
4 आनंदी राहणारे वडील : हा वडिलांचा असा प्रकार आहे जे नेहमीच हसत राहतात, आणि मस्ती धिंगाणा करतात, खेळकर असतात. कित्येकदा आपले पाय खेचतात. हे आपल्या मुलांशी मैत्रिपूर्ण व्यवहाराने वागतात.
 
5 काळजी करणारे वडील : वडिलांच्या या प्रकारामध्ये अशे लोक येतात जे आपल्या मुलांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची काळजी घेतात. त्याचा चांगल्या वाईट गोष्टीकडे जास्तीच लक्ष देतात. या मध्ये त्यांची रोखटोक पण असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दमदार पावसाने राजाराम बंधारा पाण्याखाली