Select Your Language
श्रीरामदासाची आरती
आरती रामदासा। भक्त विरक्त ईशा। उगवला ज्ञानसूर्य।।उजळोनी प्रकाशा।।धृ।। साक्षात् शंकराचा। अवतार मरुती।कलिमाजी तेचि झाली। रामदासाची मूर्ती ।।1।।वीसही दशकांचा। दासबोध ग्रंथ केला। जडजीवां उद्घरीलेंनृप शिवासी तारीलें ।।2।।ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे।कल्याण तिहीं लोकीं। समर्थ सदगुरूपाय ।।3।।आरती रामदासा ।।