Publish Date: Wed, 01 Jul 2020 (20:00 IST)
Updated Date: Wed, 01 Jul 2020 (16:52 IST)
गुरु पौर्णिमा गुरु पूजनाचा दिवस आहे परंतू गुरु प्राप्ती सोपी नाही. गुरु प्राप्ती झाल्यास श्री गुरु पादुका मंत्र घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरु पौर्णिमेला गुरु पादुका पूजन करावे. गुरु दर्शन करावे. नैवेद्य, कपडे भेट करून दक्षि देऊन त्यांची आरती करावी व त्यांच्या चरणी बसून त्यांची कृपा मिळवावी.
गुरु जवळ जाण्याची संधी मिळत नसेल तर त्यांच्या चित्र, पादुका प्राप्त करून पूजन करावे. गुरु मंत्र जपल्याने पुण्य प्राप्ती होते....गुरु पूजनासाठी हे 4 मंत्र श्रेष्ठ आहे.
1. ॐ गुरुभ्यो नम:।
2. ॐ गुं गुरुभ्यो नम:।
3. ॐ परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम:।
4. ॐ वेदाहि गुरु देवाय विद्महे परम गुरुवे धीमहि तन्नौ: गुरु: प्रचोदयात्।