Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चाणक्य नीती : या 4 लोकांकडे पैशाची कधीही कमतरता नसते

चाणक्य नीती : या 4 लोकांकडे पैशाची कधीही कमतरता नसते
, शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (09:26 IST)
आचार्य चाणक्य एक महान रणनीतीकार आणि मुत्सद्दी होते. त्यांनी आपल्या नीती ग्रंथात लोकांच्या कल्याणासाठी अनेक सूत्र सांगितली आहे. चाणक्याच्या नीतीनुसार, काही विशेष प्रकारच्या लोकांमध्ये कधीही पैशाची कमतरता होत नाही. हे लोक सर्वगुणी असतात.
 
1 दृढ इच्छाशक्ती -
एक यशस्वी व्यक्ती म्हणजे तो आहे जो आपल्या हेतूसाठी दृढ आणि मेहनती असतो. असे माणसे धनवान असतात. परंतु असे लोक जे आजच्या कामाला उद्यावर ढकलतात, अशा लोकांकडे कधीही धन येत नाही. चाणक्य म्हणतात की यशाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
 
2 प्रामाणिक - 
जे लोक कोणत्याही स्वार्था शिवाय आपल्या स्वभावाला बदलत नाही अशे लोक कधीही गरीब होत नाही. असे लोक केवळ मनानेच श्रीमंत नसतात, तर आई लक्ष्मीची कृपा ह्यांच्या वर असते. माणसाने स्वार्थासाठी आपल्या स्वभावात बदल करू नये. माणसाला प्रत्येक माणसा सह सामान वागणूक आणि व्यवहार करावा.
 
3 नम्र -
 चाणक्याच्या नीतीनुसार, नम्र स्वभावाचे माणसं लवकर यश मिळवतात. वास्तविक, माणूस इतरांशी कसा व्यवहार करतो हे त्याच्या यशावर निर्भर आहे. अशा परिस्थितीत व्यक्तीला आपल्या व्यवहाराला घेऊन अत्यंत सावध आणि सतर्क असले पाहिजे.
 
4 पैशाला योग्य प्रकारे खर्च करणारा -
आचार्य चाणक्य म्हणतात की पैसे व्यक्तीच्या आत्मविश्वासात वाढ करतात. धनाला गरजेप्रमाणे खर्च करावे. या सह, भविष्यासाठी नेहमी पैशाची बचत करावी. थोड्या-थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून देखील पैसे सुरक्षित ठेवू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पूजा केल्यावर आरती करण्याचे काय महत्त्व? जाणून घ्या