Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

4 गोष्टी ज्या स्त्री-पुरुषांनी जास्त काळ करू नयेत !

relation
Vishnu Puran विष्णु पुराण म्हणजे वैष्णव महापुराण. या विशेष पुराणात भूगोल, ज्योतिष, कर्मकांड, वंश आणि श्रीकृष्णाचे चरित्र इत्यादी अनेक घटनांचे वर्णन केले आहे. ज्या महिला आणि पुरुषांना सुखी आणि विलासी जीवन हवे आहे त्यांनी विष्णु पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे अवश्य पालन करावे.
 
आज आम्ही विष्णु पुराणात नमूद केलेल्या 4 गोष्टींबद्दल सांगणार आहेत जे कोणीही स्त्री किंवा पुरुष चुकूनही दीर्घकाळ करू नये.
 
जास्त वेळ स्नान करणे टाळावे - निरोगी आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान करणे खूप महत्वाचे आहे. आंघोळ करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर शुभ फळ मिळू शकतात. सूर्योदयापूर्वी पहाटे ताऱ्यांच्या सावलीत स्नान केल्याने अलक्ष्मी, संकटे तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते. एवढेच नाही तर स्नान करताना गुरु मंत्र, स्तोत्र, कीर्तन किंवा देवाचे नामस्मरण करावे, कारण असे केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. लक्षात ठेवा जास्त वेळ आंघोळ केल्याने आरोग्याला हानी होते.
 
दिवसा झोपणे टाळावे- त्याचबरोबर पुरेशी झोप ही जीवनशैलीत खूप महत्त्वाची आहे. दररोज 7 ते 9 तासांची झोप घेतली पाहिजे. जर तुमची झोप सतत कमी होत असेल तर तुम्हाला भविष्यात आरोग्याशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. शास्त्रानुसार सकाळी लवकर उठावे आणि रात्री लवकर झोपावे. जे लोक दिवसा झोपतात ते आतून आजारी असतात आणि दिवसा झोपणे देखील शास्त्रात निषिद्ध आहे.
 
सकाळी संबंध ठेवणे टाळावे- सकाळी पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे, कारण जास्त वेळ संबंध स्थापित केल्याने असाध्य आजार होण्याचा धोका असतो.
 
सूर्योदयानंतर झोपणे टाळावे- सूर्योदयापूर्वी उठणे केवळ तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही तर तुमच्या जीवनात समृद्धीही आणते. सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने तुम्ही रोग आणि शोक या दोन्हींना बळी पडतात आणि जिथे रोग आणि शोक राहतात तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रुद्रावतार हनुमानाची पूजा करताना हा उपाय इच्छित फळ प्रदान करेल, सर्व कष्ट दूर होतील