आज मंगळवार असून हा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज हनुमानाकडून प्रार्थना करून मागितलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. महादेवाच्या अकराव्या अवतार म्हणजेच हनुमानाला अमर राहण्याचा वरदान मिळालेला आहे.
का खास आहे मंगळवार: या मंगळवारीच हनुमानाला अमरत्वाचे वरदान मिळाले होते आणि या कारणामुळे हा दिवस मंगळ असल्याचे मानले गेले आहे.
अनेक लोकं प्रत्येक मंगळवार शुभ मानतात आणि विशेष पूजा अर्चना करतात.
इतिहासामध्ये देखील उल्लेख आहे की काही लोकांप्रमाणे सुमारे 400 वर्षांपूर्वी अवधच्या नवाबने या मंगळवाराची सुरुवात केली होती. नवाब मोहम्मद अली शहा यांचा पुत्र एकदा गंभीर आजारी होता. त्याच्या बेगम रूबियाने अनेक ठिकाणी उपचार करवून देखील यश मिळाले नाही. तेव्हा लोकांनी लखनऊच्या अलीगंज स्थित जुन्या हनुमान मंदिरात नवस करण्याचा सल्ला दिला.
येथे देवाला साकडं घातल्यावर नवाबांचा मुलगा स्वस्थ झाला. नंतर बेगम रूबियाने या मंदिराचे जीर्णोद्धार करवले. तसेच नवाबने इतक्या उन्हाळ्यात देखील प्रत्येक मंगळवारी पूर्ण शहरात जागोजागी गूळ आणि पाणी वितरित केले आणि तेव्हापासून तेथे ही परंपरा सुरू आहे.
हनुमानाला महादेवांचा 11वा अवतार रुद्र मानले गेले आहे. हा अवतार अत्यंत बलवान आहे.
हनुमानाला राग येत नाही म्हणून रागीट लोकांना हनुमानाची उपासना करण्याचा सल्ला दिला जातो.
हनुमानाला बजरंग-बली म्हणतात कारण त्यांचे शरीर एक वज्रासमान मजबूत आहे.
पृथ्वीवर केवळ 7 लोकांना अमरतत्व मिळालेले आहे ज्यातून एक पवनपुत्र हनुमान एक आहेत.
या दिवशी करावे हे 5 उपाय
1. मुलांना लाल फळं वाटावे
2. मुलांना लाल रंगाचे वस्त्र भेट म्हणून द्यावे, स्वत:देखील लाल रंगाचे वस्त्र खरेदी करावे.
3. लाल धान्य, लाल वस्त्रात दक्षिणासह गुंडाळून हनुमान मंदिर अर्पित करावे.
4. लाल सरबत वितरित करावे.
5. हनुमान मंदिरात तयार विडा अर्पित करावा.