Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समुद्र मंथनातून निघाली होती ही खास प्रकाराची दारु

समुद्र मंथनातून निघाली होती ही खास प्रकाराची दारु
, मंगळवार, 9 मार्च 2021 (12:16 IST)
धरतीचा विस्तार व्हावा आणि यावर विविध प्रकाराचे जीवन निर्माण व्हावे यासाठी देवतांचे देव ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी लीला केली आणि त्यांनी देव व त्यांचे असुर भावंड यांच्या शक्तीचा वापर करत समुद्र मंथन केले. या समुद्र मंथनातून एकाहून एक मौल्यवान रत्न निघाले त्यापैकी 14 रत्न अत्यंत खास होते. जसे सर्वात आधी ‍हलाहल विष, केमधेनु, उच्चैःश्रवा अश्व, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, अप्सरा रंभा, लक्ष्मी, चंद्र, पारिजात वृक्ष, शंख, धन्वंतरि वैद्य आणि अमृत, हे निघाले परंतू एक आणखी खास वस्तू निघाली ती म्हणजे करह ची दारु. जाणून घ्या याबद्दल-
 
वारुणी (मदिरा):
 
1. समुद्र मंथन करताना त्यातून वारुणी नावाची एक प्रकाराची मदिरा निघाली असल्याचे म्हणतात. पाण्यातून उत्पन्न झाल्यामुळे त्याला वारुणी असे म्हटले गेले. वरुण म्हणजे पाणी.
 
2. वरुण नावाचे एक देवता आहे, जे असुरांच्या बाजूला होते. वरुण यांच्या पत्नीला वरुणी म्हणतात. समुद्रातून निघालेल्या मदिराच्या देवीच्या रुपात प्रतिष्ठित झाली आणि तिच वरुण देवाची पत्नी वारुणी झाली. समुद्र मन्थन केल्यावर कमलनयनी कन्येच्या रुपात वारुणी देवी प्रकट झाली होती. म्हणतात की सुरा अर्थात मदिरा घेतलेली वारुणी देवी समुद्रातून प्रकट झाली. देवांच्या परवानगीसह त्यांना असुरांना सोपविण्यात आले.
 
3. कदंबच्या फळांनी तयार द्रव्यला देखील वारुणी म्हणतात. काही लोक ताल किंवा खजूर निर्मित मदिरा याला देखील वारुणी म्हणतात. हे समुद्रातून निघालेले वृक्ष देखील मानले जातात.
 
4. चरकसंहिता अनुसार वारुणीला मदिराच्या एका प्रकाराच्या रुपात दर्शवले गेले आहे आणि यक्ष्मा आजराच्या उपचारासाठी औषधीच्या रुपात याचा वापर केला जातो.
 
5. वारुणी नावाचा एक सण देखील असतो आणि वारुणी नावाचा एक खगोलीय योग देखील.
 
6. उल्लेखनीय आहे की देवता सुरापान करत होते आणि असुर मदिरा. असे म्हणतात की सुरांद्वारे ग्रहण केली जाणारी हृष्ट (शक्ती वर्धक) प्रमुदित (उल्लासमयी) वारुणी (पेय) म्हणूनच सुरा म्हणून ओळखली गेली. उल्लेखनीय आहे की देवता सोमरस पीत होते जी दारु नसून एका प्रकाराचं शरबत असायचं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकादशी विशेष : श्रीहरि विष्‍णूंचे विविध चमत्कारी मंत्र, नक्की जपा