Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ५

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ५
१२ गोपीचंद मैनावती
 
॥ बैसवोनी त्यासी । बद्नीकास्थानासी । ‘रक्षी तपीयासी केदारा तूं ॥५५॥
॥ जालंधर म्हणे । यात्रा पंथी जाणे । नागाश्वत्थीं जाणें । तापवीत ॥५६॥
॥ सूर्य कुंडाहूनी । हेलपट्टणासी । तृणयुक्त भारा । मिरवतू ॥५७॥
॥ जालंधर चाले । भारा पै विभक्त । चालतां देखती न - नारी ॥५८॥
॥ हेलपट्टणासी । नाथू गोपीचंदू । माता मैनावती - । नेत्र चंद् ॥५९॥
॥ नेत्रें माता देखे । माथां तृणभारू । अन्तराळी चाले । योगीयाच्या ॥६०॥
॥ स्पर्श माथां नाही । विभक्तु चाले तो । ‘गुरु हाचि करूं । सेवूं यातें ॥६१॥
॥ जालंघर-सेवा । षण्मासें करीतां । शिष्यत्वातें देत । परीक्षूनी ॥६२॥
॥ मांडी फोडूनीयां । भोंगा हा परीस । मैनावती लोह । सोनें झालें ॥६३॥
॥ मुक्ती मृत्युपूर्वी । ज्ञाती मैनावती । तेचि इच्छी माता । पुत्राप्रति ॥६४॥
 
१३ जालंधर गर्गा
 
॥ अत्तरें उटणें । स्नानें गोपीचंद । दासीं सखीं जनीं । सेवीजेला ॥६५॥
॥ देखे देह सुख । मैनावती माता । हेलावते मुक्त । अन्तरंगी ॥६६॥
॥ सुख देही होय । लोहासम जाणी । गुरु परीसें तें । स्वर्ण-वर्णी ॥६७॥
॥ देहो काष्ठ लोहो । गुरुची कीमया । मुक्त होतां माया । सुवर्ण तें ॥६८॥
॥ देह-सुखा-माजी । रंग दंग होतां । नरू, नारायणू । कैसें होती? ॥६९॥
॥ दु:खद विचारे । हेलावे ह्रदयी । अश्रू नेत्रांतूनी । ओघळती ॥७०॥
॥ उष्णें फोडू डोई । गोपीचंद-पृष्ठीं । अंगांगी उठती । राजयाच्या ॥७१॥
॥ मातेपाशी रायू । घाई घाई जायू । ‘माते कथी, कायू । तूतें छळी ॥७२॥
॥ ‘दु:खाचें कारण । नीववीन अग्नु । ‘अंतरी पोळले । शांतवीन ॥७३॥
॥ म्हणे जंव रायू । माता त्यासी कथीं । ‘देहाचे चोचले । मृत्यु जाणी ॥७४॥
॥ अन्तरीची सोये । पाही बाळ ! राया ! । लाग वेगी येई । गुरूपाशी ॥७५॥
॥ लुमावन्ता कांता । रोषें जी फणाणी । द्वेषें जालंधरा । जाळूं पाहे ॥७६॥
॥ ‘मैनावती माता । विवशी मावशी । घात पुत्रचा जी । करूं पाहे ॥७७॥
॥ सांगे ती राजया । ‘मागे मी अभया । मैना-जालंधरां । गाडीनू मी’ ॥७८॥
॥ प्रद्युम्ना, मन्मथा । पंचानना स्वतां । ब्रह्मा आवरीतां । भागेजला ॥७९॥
॥ गर्ती जालंधरा । देती वज्रदेही । अंतरी तो क्षेमू । राही सदा ॥८०॥
॥ ज्वालेंद्राते गर्ता ! । काय केलें कर्मा ! । मंथरा, कैकेयी । लाजविली ! ॥८१॥
 
१४ गांठी भेटी (१) गोरक्ष - जालंधर
 
॥ जालंधरा लोटी । गर्तेमाजी लुमा । गेला स्वामी दूरी । वार्ता केली ॥८२॥
॥ कानीफा तीकडे । संचारासी जाई । गोरक्षु मच्छिंद्रा शोधीतसे ॥८३॥
॥ हेलापट्टणासी । गोरक्षु येतसे । जन कथीतसे ॥ दुजे नाम ॥८४॥
॥ दुजा जालंधरु । ना तो मच्छिंदरू । येथें वास केला । दूरी गेला ॥८५॥
॥ गोरक्षु भिक्षेसी । जातां घरोघरी । ‘अलक्षु म्हणोनी ,निरंजन ॥८६॥
॥ ध्यानातीत विश्व । विश्वंभरे तैसा । लक्ष्यापलीकडे निरंजन ॥८७॥
॥ अर्थ अलक्षाचा । नाथचि जाणती ॥ उत्तरी आदेश । तेचि देती ॥८८॥
॥ अलक्षु संदेशु । देतु घरी एका । गर्ता केली जेथू । तेथूं येई ॥८९॥
॥ गर्तेतूनी जंव । आदेशहि तंव । जालंधर म्हणे । ‘कहीये जी ’ ॥९०॥
॥ आज्ञा महाराजा । आदेशार्थ ऐसा । पाळीन स्वयें मी । ऐकू दीजे ॥९१॥
॥ जालंधर मुखें । जाणीजेली कथा । गोरक्षासी कोपु । उग्रु येई ॥९२॥
॥ निववोनी तया । जालंधर म्हणे: । जोधी कानीफासी । कथी वार्ता ॥९३॥
॥ ‘सोडवील मज । वांचवील राजा । ‘युक्त तेचि काजा । जाणे तोचि’ ॥९४॥
॥ ‘संचारू यात्रेसी । कानीफा चालला । स्त्रियांच्या राज्यासी । मर्यादेशी ॥९५॥
॥ हनूमंत येतू । मर्यादेपर्यन्तू । भुभु:कारू देतू । युद्धार्थी तो ॥९६॥
॥ कानीफा-मारुती । अस्त्रें परस्परी प्रेरणी, वारीणी । झडवीती ॥९७॥
॥ कानीफा भूमीसी । मारुतीसी पाडी । मारुत धांवतो । सहाय्यार्थी ॥९८॥
॥ सायासी करूनी । उभयांसी सख्य । सांगे कानीफास । आदेश तो ॥९९॥
॥ ‘मच्छिंद्राते नको । नेऊं येथूनीयां । इतुकी त्वां सेवा । द्यावी आम्हां ॥१००॥
॥ तैसी भाक देतां । मारुतु मारूती । सारे निवर्तती देशोदेशौ ॥२०१॥
॥ मच्छिंदरू भेटी । कानीफासी होता । प्रेमाची लहरी । हेलावली ॥२०२॥
॥ पुढे जाण्या आज्ञा । मच्छिंदरू देती । धनें कानीफातें । वोपीती ते ॥२०३॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ४