Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

हिवाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या

Tulsi palnt care in winter season
, शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (12:04 IST)
बदलत्या हवामानात माणसाच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसू लागतो. मग तो उन्हाळा असो किंवा हिवाळा. प्रत्येक हंगामाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो. हा परिणाम माणसांवरच नव्हे तर झाडे झुडप्यांवर देखील पडतो. रात्री पडणाऱ्या दवबिंदू ह्या झाडांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. 
 
हिवाळ्यात पडणारे दवबिंदू सर्वात जास्त धोकादायक तुळशीच्या रोपट्यासाठी आहे. साधारणपणे तुळशी ही प्रत्येक हिंदू कुटुंबाचे लोक आपल्या घरात लावतातच, कारण या मागे त्यांची श्रद्धा दडलेली असते. हिंदुधर्मात तुळशीच्या रोपट्याला देव मानले आहे. प्रत्येक घरात तुळशीची पूजा केली जाते, पण हिवाळा येतातच तुळशीच रोपटं खराब होऊ लागतो. लोकांची तक्रार असते की ह्या हंगामात तुळस काळी होऊन पानगळायला सुरुवात होते.
तज्ज्ञ सांगतात की ह्या दिवसात तुळशीच्या झाडाची योग्य काळजी घेतली पाहिजे. तसे तर प्रत्येक हंगामात तुळशीच्या झाडाची काळजी घेतली पाहिजे. पण हिवाळ्याच्या हंगामात तुळशीच्या झाडाची काळजी जास्त घ्यावयाची असते. तुळशीला दवबिंदू पासून वाचवायला हवं. या साठी काही उपाय करावे.
 
* माती आणि वाळू योग्य प्रमाणात घ्या-
मातीच्या सह तुळशीचं रोपटं लावण्यासाठी वाळू वापरा. तज्ज्ञ सांगतात की ज्या कुंडीमध्ये रोपटं लावत आहात त्यामधून पाणी निघण्याची व्यवस्था योग्य असावी. अन्यथा झाडाचे मूळ गळून जाईल. या साठी नदीकाठीची वाळू घेण्याऐवजी मातीसह मौरंग ची थर कुंडीत टाकावी नंतर माती टाकावी. लक्षात ठेवा की हे दोन्ही सम प्रमाणात 50 -50  असावे. जर आपण हे प्रमाण लक्षात ठेवता तर तुळशीच्या झाडाचे मूळ जास्त पाण्यामुळे वितळणार नाही. तुळशीमध्ये सेंद्रिय खत आणि सुपीक माती घालावी या मुळे तुळशीची वाढ चांगली होईल आणि योग्य पोषण मिळेल.
 
* पाण्याचे प्रमाण लक्षात ठेवा- 
तुळशीच्या रोपट्याचं धार्मिक महत्त्व असल्याने प्रत्येक घरात सकाळी आंघोळ केल्यावर लोक पाणी घालतात आणि त्याची पूजा करतात. अशा प्रकारे जर कुटूंबातील प्रत्येक सदस्याने नियमानं तुळशीला पाणी घातले तर ते रोपटं खराब होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ सांगतात की जरी तुळशीच्या रोपट्याला ओलावा हवा असतो पण अति ओलाव्यामुळे ते खराब होऊ शकत. म्हणून दररोज पाणी घालण्या ऐवजी कुंड्यातील माती वाळू लागली की पाणी घाला. मातीची गुडाइ करा जेणे करून तुळशीला ऑक्सिजन मिळत राहो.
 
* कपड्याने झाकून घ्या -
हिवाळ्याचा काळात संध्याकाळी तापमान कमी व्हायला सुरू होते आणि  दव पडण्यास सुरू झाल्यावर तुळशीला सूती कापड्यानं कव्हर करा. असं केल्यानं दव पासून त्याचे रक्षण होऊ शकते.किंवा कपड्याचे शेड देखील तुळशीच्या रोपट्यावर लावू शकता. एवढेच नव्हे तर ज्या कुंडीत रोपटं लावले आहे त्या कुंडीच्या मातीला कोरडे गवत किंवा पेंढ्याने झाकून द्यावं, या मुळे रोपट्याला उब मिळेल.
 
* घरगुती टिप्स-
1 पाण्यात हळद मिसळून त्याचे स्प्रे तयार करा आणि दर 2 दिवसातून तुळशीच्या पानावर या मिश्रणाची फवारणी करा. असं केल्याने रोपट्याला लागलेले कीटक मरतात.
 
2 पाण्यात गोमूत्र घालून देखील या मिश्रणाची फवारणी करू शकता गोमूत्रामध्ये अँटीऑक्सीडेन्ट असतात जे तुळशीच्या रोपट्याचा पेशींना बळकट करतात, ज्यामुळे रोपटं हिरवेगार राहतो.
 
3 रोपट्यातून मंजरी निघतांनाच त्यांना काढून टाकावे. मंजरी ही रोपट्याची वाढ खुंटवते. तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स वापरून बघा आणि तुळशीच्या रोपट्याला हिवाळ्यात खराब होण्यापासून टाळा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकर संक्रांती 2021 : शुभ काळ, वाहन आणि आपल्या मिळणारे फळ जाणून घ्या