हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती पॅरिस हिल्टनने चार रात्री डीजेचे काम करून 16 लाख पाउंडस्ची (सुमारे 27 लाख डॉलर) कमाई केली आहे. 33 वर्षीय हिल्टनने इबीजामध्ये पर्यटकांसाठी आयोजित एका संगीत कार्यक्रमात सुपरस्टार डीजे म्हणून चार दिवस काम केले. एका सूत्राने द सन या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार हिल्टनने चार रात्रीत 16 लाख पाउंडस् कमविले. कार्यक्रमात सामील झालेले लोक संगीताची मजा घेत होते. पण डीजे म्हणून काम करणार्या हिल्टनची त्यांना परवा नव्हती. हिल्टर बेलिरिक बेटावरील एक आलिशान रिसॉर्टमध्ये एक महिना वास्तव्यास आहे. तिचे काम आठवड्यातून केवळ बुधवारी काही तासांसाठी असणार आहे. या इबीज येथील सर्वात मोठ्या क्लबमध्ये पाहुण्यांसाठी आयोजित कार्यक्रमात आदरातिथ्य करणार आहे.