Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोनाल्डोची नवी मैत्रीण

रोनाल्डोची नवी मैत्रीण
, सोमवार, 1 जून 2015 (14:42 IST)
फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या चर्चेत आहे तो त्याच्या खेळामुळे नाही तर, त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे. जानेवारीमध्ये इरिना शायकसोबत त्याचा ब्रेकअप झाल्यानंतर आता त्याच्या आयुष्यात नवी तरुणी आली आहे. तिचे नाव आहे अलेसिया तेदेस्ची. अलेसिया इटलीची सुपर मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
 
30 वर्षीय रोनाल्डो आणि अलेसिया सध्या प्रत्येक ठिकाणी सोबत दिसत आहेत. तीन महिन्यापूर्वी ब्रेकअप झालेल्या रोनाल्डोने अद्याप या नव्या रिलेशनबद्दल तोंडावर बोट ठेवलेले आहे. मात्र, ते एकमेकांना डेट करत असून जिथे जातील तिथे एकत्र दिसत आहेत. इटलीतील माध्यमांमधील वृत्तानुसार, स्टार फुटबॉलर रोनाल्डो अलेसियाचे सौंदर्य आणि स्टाइलवर फि दा आहे. तिच्या प्रत्येक अदा त्याला घायाळ करत आहेत. 
 
या सुपर हॉट मॉडेलने त्याला खेळताना पाहावे या इच्छेनेच रोनाल्डोने स्पेनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स लीगचे तिला व्हीआयपी निमंत्रण पाठवले होते आणि तिच्यासाठी व्हीआयपी बॉक्स सज्ज ठेवला होता. जेव्हा त्या दोघांना त्यांच्या रिलेशनबद्दल छेडले तेव्हा त्यांनी आम्ही  फक्त काही काळ एकमेकांसोबत एकांतात घालवत आहोत, असे सांगितले. रोनाल्डो आणि इरिना यांच्यात याच वर्षी जानेवारीमध्ये ब्रेकअप झाला. इरिनाने रोनाल्डोला दुसर्‍या महिलांना मॅसेज पाठवताना पकडले होते. त्यांच्या ब्रेकअपनंतर इरिना हॉलिवूड स्टार ब्रॅडले कुपरला डेट करत आहे. मात्र रोनाल्डो पाच महिने एकटाच होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi