Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तान हरल्याने आत्महत्या

पाकिस्तान हरल्याने आत्महत्या
लाहोर , शुक्रवार, 4 मार्च 2016 (14:31 IST)
पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यातील सट्ट्यावर पैसे हरल्याने मोहम्मद शफिक नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली.

शफिकने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यावेळी पाकच्या बाजूने सट्टा लावला होता. याकामी त्याचा भाऊ मोहम्मद रमझाननेही त्याला मदत केली होती.

त्यांनी वेतनातून मिळालेले 30 हजार रुपये सट्ट्यामध्ये लावले होते. मात्र या सामन्यात पाकिस्तान पराभूत झाल्याने त्यांना ही रक्कम गमवावी लागली.

यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या मोहम्मद शफिकने जुन्या अनारकली परिरसरातील सिंचन विभागाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi