Publish Date: Mon, 14 Nov 2016 (14:16 IST)
Updated Date: Mon, 14 Nov 2016 (14:19 IST)
अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाला फक्त १ डॉलर वेतन म्हणून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला वर्षाला ४ लाख डॉलरचे वेतन मिळते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी संभाळताना मी वर्षाला फक्त १ डॉलर वेतन म्हणून घेईन तसेच सुट्टयाही घेणार नाही असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील नावाजलेले उद्योगपती असून, ते गर्भश्रीमंत आहेत. सुरुवातीपासूनच ट्रम्प बेताल वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत.
webdunia
Publish Date: Mon, 14 Nov 2016 (14:16 IST)
Updated Date: Mon, 14 Nov 2016 (14:19 IST)