अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर सायबर हॅकिंगच्या आरोपांप्रकरणी त्याचे समर्थन केले आहे. रशियाला दोषी ठरविणे गैर आहे. लोकांना माहिती नसलेल्या काही गोष्टी मला समजल्या आहेत. हेरयंत्रणेच्या अधिकार्यांशी त्यांच्या आरोपांविषयी चर्चा करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याप्रकरणी संगणक सुरक्षित नाहीत. जर कोणाकडे काही महत्त्वपूर्ण माहिती असेल, तर ती लिहून काढत पाठविण्यासाठी कुरियरचा वापर करावा कसे ट्रम्प यांनी सुचविले. काही दिवसांपूर्वीच ओबामा प्रशासनाने या प्रकरणी 35 रशियन राजनैतिक अधिकार्यांना देशाबाहेर काढण्याचा आदेश जारी केला आहे.