Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

ब्रिटनमध्ये होणार लग्नसराई : प्रिन्स करणार लग्न

engagement of Prince Harry to Ms. Meghan Markle.
, मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:56 IST)
पूर्ण जगात ब्रिटनच्या राणीच्या घरात काय सुरु आहे हे कुतूहल जगाला असते. पूर्ण जगावर राज्य केलेल्या या देशातील राणी आणि तिचे नातू काय करतात हे सर्वाना माहिती करवून घ्यायचे असते.  लग्नसराईचे वारे फक्त भारतापुरताच मर्यादित राहिले  ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंतही लग्नसराईचे वारा पोहोचले आहेत. यामध्ये राजकुमार  अर्थात  प्रिन्स हॅरी Prince Harry लवकरच विवाह करणार आहेत. त्यासाठी राज्य घराण्याने  अधिकृतपणे जाहीर केले आहे. यामध्ये  प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कले Meghan Markle यांच्या शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र यामध्ये तारीख ही पुढील वर्षी जानेवारी  २०१८ ची वाट पाहावी लागणार आहे. जगातील अग्रगण्य वृत्तपत्र ‘डेली मेल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चार महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर हॅरीने मेगनला लग्नाची मागणी घातली.  शाही घराण्यात घालून देण्यात आलेल्या नियमांप्रमाणे हॅरीला मेगनशी लग्न करण्यासाठी ब्रिटनच्या राणीची रितसर परवानगी घ्यावी लागली. राजघराण्यात शाही मुकुटाचे मानकरी असणाऱ्यांमध्ये हॅरी पाचव्या क्रमांकावर असल्यामुळेच चित्रपट अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध होण्यासाठी त्याला राणीची रवानगी घेणे गरजेचे होते. अशी मागणी येताच राणीच्या सहमतीनेच हॅरी आणि मेगनचा साखरपुडा झाला आहे.  त्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्याकजूनच प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्वाधिक बनावट ,दर्जाहीन संशोधन नियतकालिके भारतात तयार होतात