लंडन- आपण अनेकदा मोटारीत असताना किंवा वाहनावर असताना हवे ते ठिकाण शोधण्यासाठी जीपीएसचा वापर करीत असतो, पण ही सुविधा वापरण्यामुळे मेंदूतील एक भाग बंद होतो जो प्रत्यक्षतात गंतव्याच्या विविध मार्गाचे सादृश्यीकरण करीत असतो. त्यामुळे मेंदूची नैसर्गिक क्षमता कमी होते असा याचा दुसरा अर्थ आहे. नवीन संशोधनानुसार जीपीएसचा अतिरेकी वापर हा अशा प्रकारे मेंदूच्या नैसर्गिक क्षमतांना कमकुवत करणार आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी मध्य लंडनमध्ये दिशाशोधन करणार्या 24 स्वयंसेवकांवर हा प्रयोग केला त्यात त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंगही करण्यात आले होते.