सौदी अरेबियाच्या वाळवंटाचे सर्वांना आकर्षण आहे. मोठ्या इमारती आणि अत्याधुनिक सोयी सुविधांसाठी सौदी अरबचे खूप नाव आहे. अनेक भारतीय या ठिकाणी पर्यटनासाठी जातात. भारतातील एका तरुणाला वाळवंटे फिरणे चांगलेच महागात पडले. त्याला आपला जीव गमवावा लागला.
तेलंगणाच्या करीमनगरचा राहणारा हा एनआरआय तरुण सुदानच्या एका नागरिकांसोबत सौदीच्या वाळवंटात फिरायला गेला अचानक त्यांचे जीपीएस बंद पडले.गाडीतील तेल संपले, मोबाईल बंद झाला. हे दोघे तरुण जवळपास चार दिवस वाळवंटात भरकटत राहिले.
प्रचंड ऊन, उष्णतेत त्यांच्या कडे खायला आणि पाणी देखील न्हवते. चार दिवस वाट शोधण्याचा प्रयत्नांनंतर उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू झाला. मोहम्मद शहजाद असे या भारतीय तरुणाचे नाव असून तो गेल्या तीन वर्षांपासून सौदीच्या एका टेलिकम्युनिकेशन कंपनीत काम करत होता.त्याचा मृत्यू रुब अल खलीच्या वाळवंटात झाला.
हे वाळवंट जगातील सर्वात भयानक वाळवंट प्रदेश म्हणून ओळखले जाते. हे सुमारे 650 किलोमीटरच्या परिसरात पसरला आहे.