Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Plane Crash in Nepal: नेपाळमध्ये 68 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान दुर्घटनाग्रस्त

Plane Crash in Nepal: नेपाळमध्ये 68 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान दुर्घटनाग्रस्त
, रविवार, 15 जानेवारी 2023 (12:20 IST)
नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे.नेपाळमध्ये 72 प्रवासी क्षमतेचं विमान पोखरा विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
येती एअरलाईन्सच्या या विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू सदस्य होते अशी माहिती समोर येते आहे.

जुना विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यादरम्यान रनवेवर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची प्राथमिक माहिती येती एअरलाईन्सच्या सुदर्शन बारतौली यांनी दिल्याचं 'काठमांडू पोस्ट'ने म्हटलं आहे.
 
विमान अपघातात सापडलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून तूर्तास विमानतळाहून अन्य विमानांची वाहतूक स्थगित करण्यात आली आहे.
 
"अपघातात सापडलेल्या प्रवाशांची आम्ही माहिती घेत आहोत. दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत", असं नेपाळचे नागरी उड्डान प्राधिकरणाचे प्रवक्ते जगन्नाथ निरुला यांनी सांगितलं. आपात्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं

अपघाताबाबत माहिती देताना यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी सांगितले की, यती एअरलाइन्सच्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ क्रॅश झालेले प्रवासी विमान ATR-72 हे यति एअरलाइन्सचे असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या चित्रे आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
 
मागील वर्षी मे महिन्यात खराब हवामानामुळे पहारी मुस्तांग जिल्ह्यात तारा एअरचे विमान कोसळले होते. या घटनेत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खराब हवामानामुळे विमान डावीकडे न जाता उजवीकडे वळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यामुळे विमान डोंगरावर जाऊन कोसळले.

Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Odisha: मकर संक्रांतीच्या मेळाव्यात पुलावर चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू