Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘आयपीएल’चा महासंग्राम आजपासुन; पहिल्या लढतीसाठी धोनी-विराट सज्ज

‘आयपीएल’चा महासंग्राम आजपासुन; पहिल्या लढतीसाठी धोनी-विराट सज्ज
चेन्नई , शनिवार, 23 मार्च 2019 (09:34 IST)
आयपीएलच्या 12व्या मोसमाला आजपासुन सुरूवात होणार असुन तीन वेळचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज समोर आज तीन वेळा उपविजेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे.
 
चेन्नई सुपर किंग्ज या संघाला आयपीएलमधील सर्वात बलाढ्य संघ असून यासंघाने आतापर्यंत 2010, 2011 आणि 2018 अशा तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावली असून यंदा पुन्हा एकदा चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या अपेक्षेने चेन्नईचा संघ मैदानात उतरताना दिसेल. तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा संघ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत 2009, 2011 आणि 2016 मध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांना स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यात अपयश आले होते.
 
बंगळुरूच्या संघात अनेक दमदार कामगिरी करणारे फलंदाज असले तरी अनेकदा संघाची कामगिरी ढेपाळली आहे. काही खेळाडू वैयक्तिक कामगिरी चांगली करतात. मात्र, सांघिक कामगिरी करण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ कमी पडतो. त्यामुळे पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी टीमवर्कवर रॉयल चॅलेंजर्सला भर द्यावा लागणार आहे.
 
वयाचा प्रश्‍न सोडला तर चेन्नईचा संघ आयपीएलचे दहा मोसम खेळलेला असून या सर्व मोसमांमधे त्यांच्या संघाला सर्वात जास्त सातत्य राखणारा संघ समजला जातो आहे. कारण , दहा मोसमांपैकी तीन मोसमात चेन्नईच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे तर दोन मोसमात त्यांचा संघ अंतिम सामन्यात पराभुत झाला आहे. त्यामुळे सर्वात जास्त वेळा अंतिम सामन्यात सहभागी होण्याचा मान देखील चेन्नईच्याच संघाने पटकावलेला असून यंदाही चेन्नईचा संघच अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी खेळताना दिसून येणार आहे. त्यातच स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा यांच्या सोबतच दिपक चहर आण्इ शार्दुल ठाकुर यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
 
प्रतिस्पर्धी संघ
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.
 
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर. नव्याने दाखल झालेले खेळाडू – मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेची महाराष्ट्रातील पहिली एकवीस उमेदवारांची यादी जाहीर