Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जास्त ’लाइक्स’हवे मग करा सायंकाळी पोस्ट

जास्त ’लाइक्स’हवे मग करा सायंकाळी पोस्ट
, सोमवार, 13 जुलै 2015 (12:06 IST)
एका भारतवंशीय संशोधकाने फेसबुकवर सर्वाधिक लाइक्स मिळवण्याचा मार्ग शोधून काढला आहे. त्यांच्या मते, एखाद्याने कार्यालयीन कामकाजादरम्यान सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान पोस्ट टाकली तर त्यास इतरांच्या तुलनेत भरपूर लाइक्स मिळतील. सॅन फ्रान्सिस्कोत प्रथमच वैज्ञानिकांनी लिथियम टेक्नॉलॉजीद्वारा फेसबुक, ट्विटर पोस्टवरून वापरकर्त्याची वर्तणूक आणि प्रतिक्रियांचा अभ्यास केला.
 
यासाठी वैज्ञानिकांनी 120 दिवसांच्या काळात सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस, न्यूयॉर्क, लंडन, टोकियोसह अन्य अनेक शहरांतील 14 कोटी 40 लाखांहून अधिक पोस्ट तसेच एक अब्ज 10 कोटी प्रतिक्रिया पडताळून पाहिल्या. संशोधनकार्यात भारतवंशीय आदित्य राव, प्रांतिक भट्टाचार्य, निमांजा स्पासोजेव्हिक आणि हिस्हेंग ली यांनी मेहनत घेतली. सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान एखादी पोस्ट केल्यास तिला सर्वाधिक लाइक्स, रिट्विट, रिप्लाय आणि शेअर्स मिळतात, असा निष्कर्ष त्यांनी काढला.
 
मात्र, मध्यरात्री एखादी पोस्ट केल्यास तिला तितक्या लाइक्स मिळत नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi