Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

TikTok वर आता आई-वडिलांची नजर

TikTok वर आता आई-वडिलांची नजर
, गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (12:06 IST)
प्रसिद्ध व्हिडिओ प्लेटफॉम टिकटॉक वर आता पालकांची नजर असेल. आता यात आलेल्या नवीन फीचरमुळे मुलं टिकटॉकवर काय शअेर करत आहे याची माहिती त्यांच्या पालकांना आधीच समजेल. फॅमिली सेफ्टी फीचर असं या फीचरचं नाव आहे. 
 
हे नवीन फीचर पालकांच्या अकाउंट्सला लिंक करतं त्यामुळे पालकांना या टिकटॉकची माहिती शेअर करण्यापूर्वी कळेल.
 
यूजर्सला सुरक्षित अनुभव देण्यासाठी कंपनीकडून हे नवं फीचर आणलं जात आहे. फॅमिली सेफ्टी मोड या फीचरच्या मदतीने पालक अल्पवयीन मुला-मुलीच्या टिकटॉकवर नियंत्रण ठेवू शकतात. मुलं यावर काय करत आहे त्यावर पालकांची नजर राहील ज्यामुळे सुरक्षित अॅप म्हणून टिक टॉकची ओळख देखील तयार होईल.
 
भारतीय युजर्सने टिकटॉकवर वेळ घालवण्यात फेसबुकला देखील मागे टाकले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यूजर्सने यावर सहा पटीने अधिक वेळ घालवला आहे. 2019 मध्ये भारतीयांनी 5.5 अब्ज तास टिकटॉकवर घालवला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रपूर अपघातात 6 भाविक ठार, 6 जखमी