Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर लाँच, आता ग्रुपमध्ये तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणी जोडू शकणार नाही

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर लाँच, आता ग्रुपमध्ये तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणी जोडू शकणार नाही
, गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (11:55 IST)
फेसबुकच्या मालकीची इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर सुरू केले आहे, ज्यामध्ये वापरकर्त्याजवळ नियंत्रण असेल की कोणीही त्याला त्याच्या इच्छेशिवाय कुठल्याही ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकत नाही.
 
कंपनीने म्हटले आहे की पिगासस हेरगिरी अॅपमुळे त्याला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला आहे. खरं तर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अवांछित ग्रुपमध्ये सामील होऊ नये म्हणून एखाद्याकडे तीन पर्याय होते. यात एवरीवन, 'माय कॉन्टॅक्ट्स आणि नोबॉडी सामील होते.
 
व्हॉट्सअ‍ॅपने एका ब्लॉगमध्ये सांगितले आहे की नवीनतम वर्जनमध्ये 'कुणीही नाही' ऐवजी 'माय कॉन्टॅक्ट्स ऍक्सेप्ट' हा पर्याय आहे. याद्वारे, वापरकर्ते आता त्यांच्या संपर्कातील लोकांना निवडू शकतात ज्यांच्याद्वारे त्यांना कोणत्याही ग्रुपमध्ये सामील होऊ इच्छित नाही.
 
महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सअॅपचे जगभरात दीड अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत, त्यापैकी एकट्या भारतात 400 दशलक्ष वापरकर्ते आहेत. याने एप्रिलमध्ये एक फीचर सादर केले ज्यामध्ये यूजरला ही सुविधा देण्यात आली होती की त्यांना ग्रुपमध्ये कोण सामील करू शकतात याचे नियंत्रण त्यांच्या हातात असेल. या अगोदर पूर्वी व्हॉट्सअ‍ॅप यूजरला त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही ग्रुपमध्ये सामील करण्यात येत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवाच्या प्रसादातून सायनाईड; दीड वर्षात 10 खून - सीरियल किलरचा थरार