व्हॉट्सअॅपवर अनेकदा घाईत किंवा चुकीने एखादा मेसेज पाठवला जातो मात्र तो डिलीट करण्याची सुविधा नसल्याने कित्येकदा ओशाळ्यासारखं होतं. यानंतर केवळ माफी मागणे हाच एक पर्याय उरायचा पण आता व्हॉट्सअपने नवीन फीचर आणले असून यामध्ये मेसेज पाठवल्यानंतर तो मेसेज डिलीट किंवा एडिटही करता येईल.
यासाठी व्हॉट्सअॅप काही महिन्यापासून रिव्होक या फीचरवर काम करत होता आणि आता व्हॉट्सअॅपने वेब व्हर्जनवर सुरू केल्याची बातमी आहे.
व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती लीक करणारं ट्विटर हॅण्डल @WABetaInfoने ही माहिती शेअर केली आहे. या माहितीप्रमाणे प्रमुख म्हणजे मेसेज डिलीट किंवा एडिट करण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच मिनिटांचा अवधी असेल.