Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन वर्षात WhatsApp वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! या अटी मान्य न केल्यास खाते Delete करावे लागतील

नवीन वर्षात WhatsApp वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! या अटी मान्य न केल्यास खाते Delete करावे लागतील
, बुधवार, 6 जानेवारी 2021 (14:27 IST)
नवीन वर्षात व्हॉट्सअ‍ॅपची सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्याच्या अटी पूर्णपणे स्वीकारल्या पाहिजेत. होय, इन्स्टंट मेसेजिंग अॅपने आपले नियम व गोपनीयता धोरण अपडेट केले असून मंगळवारी संध्याकाळपासून याची सूचना हळूहळू भारतातील वापरकर्त्यांना दिली जात आहे. वापरकर्त्याने व्हॉट्सअॅपच्या सर्व अटी मान्य न केल्यास त्यांना त्यांचे खाते हटवावे लागेल. यापूर्वी असे सांगितले गेले होते की व्हॉट्सअ‍ॅपची नवीन अटी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होतील, परंतु ती हळू हळू रोलआउट केली जात आहे. ही माहिती WABetaInfoने स्क्रीनशॉटद्वारे शेअर केली आहे.
 
वापरकर्त्यांना त्यांचे खाते सुरू ठेवण्यासाठी नवीन धोरण स्वीकारावे लागेल. सध्या येथे 'नॉट नाऊ' हा पर्यायदेखील दिसतो, पण व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना नवीन पॉलिसी स्वीकारण्यासाठी 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत दिले आहे. तोपर्यंत हे धोरण वापरकर्त्यांद्वारे ऍक्सेप्ट करावे लागेल अन्यथा खाते हटवावे लागेल.
 
व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेटेड पॉलिसीत आपल्या कंपनीला देण्यात येणार्‍या लाइसेंसमध्ये काही गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्यात म्हटले आहे की आमच्या सेवा ऑपरेट करण्यासाठी, आपण जगभरातील सामग्री अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड किंवा रिसीव करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरता, त्यांना  यूज, रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले  करण्यासाठी जगभरात नॉन-एक्सक्लूसिव, रॉयल्टी फ्री,  सब्लिसेंसेबल आणि ट्रांसफरेबल लाइसेंस देतात.
 
यामध्ये असेही लिहिले आहे की या परवान्याद्वारे आपण दिलेला हक्क आमच्या सेवा ऑपरेट करणे आणि प्रदान करण्याच्या मर्यादित उद्देशाने आहेत. यात असे देखील सांगण्यात आले आहे की फेसबुक बिझनेससाठी तुमच्या चॅटला कसे स्टोर आणि व्यवस्थापित करेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यानेही गेल्या महिन्यात नवीन अटींची पुष्टी केली आणि म्हटले की व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी त्याच्या अटींशी सहमत असणे आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लशीत डुकराचे मांस नाही, नपुंसक होण्याची भीती नाही-डॉ. रमण गंगाखेडकर