Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ष 2020मध्ये या स्मार्टफोन्स मध्ये व्हाट्सऍप काम करणार नाही, जाणून घ्या कोण कोणते फोन आहे ते

वर्ष 2020मध्ये या स्मार्टफोन्स मध्ये व्हाट्सऍप काम करणार नाही, जाणून घ्या कोण कोणते फोन आहे ते
नवीनवर्षाच्या आगमनाबरोबरच जगातील सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग एप व्हाट्सऍपने काही फोन मधील व्हाट्सऍपला बंद करण्याचे निर्णय घेतले आहे. कंपनीच्या माहितीनुसार 31 डिसेंबरानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम वर चालणारे स्मार्टफोन्स वर व्हाट्सऍप चालणार नाही.
 
1 फेब्रुवारी 2020 पासून व्हाट्सऍप अँड्रॉइड आवृत्ती 2.3.7 आणि आयओ एस 7च्या आयफोन्स वर व्हाट्सऍप चालणार नाही. कंपनीच्या मतानुसार बाकी यूजर्स वर ह्याचा परिणाम होणार नाही. एंड्रॉयडचे किटकैट व्हर्जन 4.0.3 व्हर्जनच्या आणि या व्हर्जनच्या स्मार्टफोन्समध्ये ही   सुविधा उपलब्ध असणार आहे. पण ह्या व्हर्जनच्या खालील स्मार्टफोन्स मध्ये ही सुविधा मिळणार नाही. 
 
31 डिसेंबरानंतर विंडोजच्या फोन्स मध्ये व्हाट्सऍप चालणार नाही. जर आपण विंडोज फोन वापरात असल्यास आपल्यासाठी ही वाईट बातमी आहे. व्हाट्सऍप ने जाहीर केले आहे की ह्या वर्ष अखेरीस सर्व विंडोज फोनमधील व्हाट्सऍप सेवा बंद करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CCA वर कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला - रवीशंकर प्रसाद