Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 22 April 2025
webdunia

किती थापा मारल्या याचा हिशोब द्या - राज ठाकरे

Raj Thackeray
, मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:16 IST)
मनसेच्या सभा खर्चाचा हिशोब मागण्यापेक्षा पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या, त्याचा हिशोब करावा. रोज नवीन नवीन गोष्टी येतात, अन् मागचं सगळं लोक विसरून जातात. देशभरात भाषण करताना जी स्वप्न दाखवली गेली त्याबद्दल पंतप्रधान एकही शब्द काढायला तयार नाही अशी जोरदार  टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलीय. सोलापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा झाली त्यात राज ठाकरे बोलत होते. जाहीरसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी राज ठाकरे यांनी भाजपाकडून मनसेच्या सभांचा खर्चाचा  हिशोब मागितला आहे त्याचा त्याचा जोरदार समाचार राज यांनी  घेतला आहे.
 
राज ठाकरे सभेत म्हणाले की, देशात स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या जाहिरातींवर नरेंद्र मोदी सरकारने 4880 कोटी रुपये खर्च केलेअसून, मेक इन इंडियाचं पुढे काय झालं? त्यातही स्मार्ट सिटी काय झालं? नाशिक महापालिका आणि उद्योगपती यांच्या पैशातून नाशिकमध्ये मनसेच्या काळात जी कामं केली ती स्मार्ट सिटीत का दाखवली आहेत. नरेंद्र मोदी यांना तीस वर्षानंतर देशात एकहाती बहुमत मिळालं होत, तुम्ही सांगितलेल्या स्वप्नावर लोकांनी आपल मतं तुम्हाला दिली आहे, मात्र आता लक्षात येतं की नरेंद्र मोदी देशाची खोटं बोलले. जे तुम्ही बोललात त्याबद्दल अवाक्षरंही काढलं जात नाही, तुम्ही आश्वासने आणि किती थापा दिल्या याचा हिशोब दिला पाहिजे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवी मुंबईच्या 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार