Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनमोहन व अडवाणी दोघांपैकी कुणीही नाही!

मनमोहन व अडवाणी दोघांपैकी कुणीही नाही!

वेबदुनिया

PTIPTI
देशभर पुढचा पंतप्रधान कोण यासाठी चर्चा रंगत असताना आणि राजकीय पक्ष त्‍यासाठी जोड-तोडचे गणित करीत असताना ज्‍योतिषशास्‍त्राचा बाजारही तेजीत असून भविष्यवेत्यांच्‍या मतानुसार 16 मेच्‍या मतमोजणीनंतर देशाला पुन्‍हा एकदा त्रिशंकू लोकसभेला सामोरे जावे लागणार आहे. त्‍यामुळे लहान-लहान घटक पक्षांची भूमिका महत्‍वाची ठरणार असून मनमोहन किंवा अडवाणी दोघांपैकी कुणालाही पंतप्रधान बनण्‍याची संधी मिळणार नाही.

एक प्रसिध्‍द ज्योतिषी पंडित अनंत सुरळकर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार कॉंग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी (भाजपा) या दोघांपैकी कोणत्याही पक्ष किंवा आघाडीला बहुमत मिळणार नाही. कॉंग्रेसला जास्‍तीत जास्‍त 135 ते 140 जागा मिळतील तर भाजपाला 165 च्‍या आसपास जागा मिळण्‍याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत सरकार बनविण्‍यात तिस-या आघाडीची आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे.

मनमोहन सिंह हे पुन्‍हा पंतप्रधान होण्‍याची शक्यता त्‍यांनी स्‍पष्‍ट पणे नाकारली आहे. या पदासाठी ऐनवेळी सर्वांना आश्‍चर्यचकीत करणारे नाव समोर येण्‍याची शक्यता आहे. यात तिस-या आणि चवथ्‍या पक्षाची भूमिका महत्‍वाची ठरणार आहे.

तर दुस-या बाजूला भाजपाचे पीएम इन वेटींग लालकृष्ण आडवाणी हे पंतप्रधान बनण्‍याच्‍या अगदी जवळ येऊनही पंतप्रधान बनू शकणार नाहीत. अडवाणी यांच्‍या कुंडलीत शनीची स्थिति मजबूत असली तरीही ते पंतप्रधानपदाच्‍या खुर्चीत स्‍थानापन्‍न होऊ शकणार नाहीत.

अस्थिरतेची परिस्थिती आगामी काळात पहायला मिळणार असून सरकार कुणाचेही बनले तरीही ते दोन वर्षांपेक्षा अधिक वेळ टीकू शकणार नाही. आणि मध्‍यावधी निवडणुका घेण्‍याची गरज पडणार आहे. त्यानंतर मात्र स्थिर सरकार बनण्‍याची शक्यता अधिक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi