Publish Date: Wed, 19 Sep 2018 (09:16 IST)
Updated Date: Wed, 19 Sep 2018 (09:18 IST)
बिग बॉसच्या १२ व्या पर्वातील पहिलंच टास्क अपूर्ण राहिल्यामुळे त्याच्यावर अनेकांचा रोष ओढावणार आहे. यात प्रेस कॉन्फरन्स हे टास्क देण्यात आलं होतं. ज्या टास्कअंतर्गत कोणत्याही एका जोडीचं नाव घेऊन ते कशा प्रकारे कमकुवत आहेत आणि घरात राहणं त्यांच्यासाठी कशा प्रकारे कठिण आहे, हे सांगायचं होतं. ज्यामध्येच आता श्रीसंत सर्वांच्या निशाण्यावर असणार आहे.
प्रेस कॉन्फरन्सं टास्क पूर्ण न करु शकल्यामुळे नाईलाजास्तव श्रीसंत हे टास्क सोडतो. ज्यामुळे ‘बिग बॉस’च्या निर्णयानंतर हे टास्कच रद्द करण्यात येतं. हे टास्क रद्द झाल्यामुळे त्याच्यावर घरातील इतर सदस्यांनी आगपाखड केल्याचं पाहायला मिळत असून, आता त्याच्यावर घरातून बाहेर पडण्याची वेळ येते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.