Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुगलकडून बालदिनाचे खास डुडल

गुगलकडून बालदिनाचे खास डुडल
, बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (09:11 IST)
यंदा बालदिनाच्या गुगल इंडियाकडून खास प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि पंडित नेहरुंनी देशाला दिलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाची भेट या दोन्ही गोष्टींवर गुगलने आज खास डुडल साकारले आहे.
 
डुडलमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती देताना आकाशात ग्रह-तारे, आकाशगंगा, सप्तर्षी दाखवण्यात आली आहे. तसेच एका बाजूला आकाशात झेपावण्यासाठी सज्ज असलेले एक अवकाश यानही दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबरच लहान मुलांमधील जिज्ञासू वृत्तीचे दर्शनही यातून घडवण्यात आले आहे. एक लहान मुलगी एका मोठ्या दुर्बिणीतून अवकाश दर्शन करीत असून तिच्या बाजूला जमिनीवर एक तंबू टाकण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये साहसी खेळ आणि भटकंतीचे संस्कार व्हावे याचे ते प्रतिक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तर अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहास घडेल