प्रेम हे कोणासोबत पण होऊ शकत.सध्या समलैंगिक विवाह करण्यावरून देशात वाद सुरु आहे. अशा परिस्थितीत कोलकात्यात दोन तरुणींनी आपसात लग्नगाठ बांधली. या विवाहची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मौमिता आणि मौसमी असे या तरुणींची नावे आहेत. मौसमी ने सांगितल्या प्रमाणे मौसमी विवाहित असून तिचा पती तिला दररोज मारहाण करायचा. दररोजच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने पतीशी घटस्फोट घेऊन दोन्ही मुलांना घेऊन वेगळी राहू लागली. नंतर तिच्या आयुष्यात मौमिता आली.त्यांची भेट इंस्टाग्राम वर झाली नंतर तिचे आयुष्य बदलले. मौमिता आणि तिची मैत्री झाली नंतर त्याचे प्रेमात रूपांतरण झाले. मौमिताने मौसमीचा तिच्या दोन्ही मुलांसह स्वीकार केला आहे. 22 मे रोजी दोघानीं हळदी, मेहंदी सर्व कार्यक्रम करत बंगाली पद्धतीने लग्न केलं. मौमिता वराच्या रूपात मौसमीची मंदिरात वाट पाहत होती. वधूच्या रूपात मौसमी मंदिरात पोहोचली नंतर दोघानीं लग्नगाठ बांधली. समलैंगिक जोडप्यांसाठी हे लग्न म्हणजे आशेचा किरण आहे.
मौमिताने सांगितलं की, 'कधीही कोणात भेदभाव करू नये. जर भिन्नलिंगी जोडपी लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू शकतात. तर समलिंगी जोडपी लिव्ह-इन रिलेशनमध्ये का नाही राहू शकत. प्रत्येकाला आपल्याला आवडणाऱ्या प्रिय व्यक्तीसोबत राहण्याचे जीवनातले सुख अनुभवता घेण्याचा अधिकार आहे आणि ते त्याला आले पाहिजे.'